आमच्याबद्दल

''डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना ''

महाराष्ट्र शासनेच्या महत्वपूर्ण योजनांपैकी असणाऱ्या या योजना आहे. ज्यात लोकांना ‘एकाचवेळी अनेक योजनांची माहिती’ या ठिकाणी मिळेल. योजनांचा लाभ कसा आणि कोणत्या पद्धतीने घ्यावा याची इत्यंभूत माहिती येथे उपलब्ध असेल. सहज, सुलभ आणि सरळ ही त्रिसूत्री या पोर्टलचे वैशिष्ट्य असेल. केवळ योजना करून न थांबता त्या योजनेच्या फायद्या सोबतच त्यातून युवकांना तसेच इतरांना नोकरी व अर्थाजन कसे होईल याचाही विचार याठिकाणी केला आहे. एव्हढेच नव्हे तर योजनेंच्या लाभासाठीचा होणारा आटापिटा आता थांबणार असून योजनेंचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न या पोर्टलद्वारे केला जाईल.

स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायासाठी लढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीय जनतेच्या जगण्याला आधार दिला, दिशा दिली त्यांच्या याच ध्येय धोरणांना दृष्टीपथा समोर ठेवून ही योजना आम्ही नागरिकांकरिता सुरू केल्या आहेत

अनेकदा या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत लोकांना या योजनांची माहितीच मिळत नाही मिळाली तरी त्याचा लाभ कसा घ्यायचा हे लक्षता येत नाही. त्यामुळे योजनेची उद्दिष्ट साध्य होत नाही आणि ज्यांच्या साठी हा सगळा घाट घातलेला असतो ते या सगळ्या योजनांच्या लाभापासून वंचितच राहतात म्हणूनच कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी हि योजना आम्ही घेवून आलो आहोत.

तसेच विविध व्यवसायांना महाराष्ट्रातील योजनांचा योग्य लाभ मिळावा आणि या व्यवसायातून स्थानिक लोकांना रोजगार मिळावा या साठीही प्रयत्नशील आहोत. हे सगळे करत असताना सामाजिक जाणिवांचा देखील विचार करणे महत्वाचे असते एव्हढेच नव्हेतर नवीन व्यवसाय सुरू करणार्यांना देखील येथे योग्य मार्गदर्शन मिळून महाराष्ट्रातील अनेक योजनांचा लाभ घेता यावा

याच सगळ्या बाबींचा विचार करून आम्ही या योजना अत्यंत सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत कश्या पोहचतील याचा विचार करून पाऊल उचलले आहे. जेणे करून लोकांनी लोकांसाठी सुरू केलेल्या या शासनाला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होवून खऱ्या अर्थाने शासन हे सुशासन ठरु शकेल.

या योजना नक्कीच प्रत्येक भारतीयांसाठी जगण्याचा आधार बनतील व सोबतच त्यांच्या भविष्याला दिशा देण्यास ही सहाय्यक ठरतील ज्या महापुरुषांच्या नावाने या व अन्य योजना आहेत त्या नक्कीच त्यांच्या कर्तुत्वाला साजेशा ठरतील यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील आहोत.

01_govScheme

शासकीय योजना

महाराष्ट्रातील सर्व शासकीय योजनांची इत्यंभूत माहितीचे एकमेव ठिकाण.

02_ecom

वस्तू आणि सेवा

स्वदेशी वस्तूची घेवाण देवाण योग्य दरात होण्यासाठी उपयुक्त.

03_jobs

नोकरी

'स्थानिकांना आपल्याच क्षेत्रात रोजगाराची उपलब्धता’.

विभाग