डॉ बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना
सामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेऊन हि योजना आखली गेली आहे. जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळावा. 'जनतेसाठी हे शासन सुशासन ठरावे' हे एकमेव उघिष्ट डोळ्यासमोर ठेवून या योजनेची अमलबजावणी होणार आहे.
सेवा आणि सुविधा
शासकीय योजना
महाराष्ट्रातील सर्व शासकीय योजनांची इत्यंभूत माहितीचे एकमेव ठिकाण.
वस्तू आणि सेवा
स्वदेशी वस्तूची देवाण घेवाण योग्य दरात होण्यासाठी उपयुक्त होईल.
नोकरी
'स्थानिकांना आपल्याच क्षेत्रात रोजगाराची उपलब्धता’.
स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायासाठी लढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीय जनतेच्या जगण्याला आधार दिला, दिशा दिली त्यांच्या याच ध्येय धोरणांना दृष्टीपथा समोर ठेवून ही योजना आम्ही नागरिकांकरिता सुरू केल्या आहेत
अनेकदा या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत लोकांना या योजनांची माहितीच मिळत नाही मिळाली तरी त्याचा लाभ कसा घ्यायचा हे लक्षता येत नाही. त्यामुळे योजनेची उद्दिष्ट साध्य होत नाही आणि ज्यांच्या साठी हा सगळा घाट घातलेला असतो ते या सगळ्या योजनांच्या लाभापासून वंचितच राहतात म्हणूनच कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी हि योजना आम्ही घेवून आलो आहोत.
तसेच विविध व्यवसायांना महाराष्ट्रातील योजनांचा योग्य लाभ मिळावा आणि या व्यवसायातून स्थानिक लोकांना रोजगार मिळावा या साठीही प्रयत्नशील आहोत. हे सगळे करत असताना सामाजिक जाणिवांचा देखील विचार करणे महत्वाचे असते एव्हढेच नव्हेतर नवीन व्यवसाय सुरू करणार्यांना देखील येथे योग्य मार्गदर्शन मिळून महाराष्ट्रातील अनेक योजनांचा लाभ घेता यावा
याच सगळ्या बाबींचा विचार करून आम्ही या योजना अत्यंत सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत कश्या पोहचतील याचा विचार करून पाऊल उचलले आहे. जेणे करून लोकांनी लोकांसाठी सुरू केलेल्या या शासनाला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होवून खऱ्या अर्थाने शासन हे सुशासन ठरु शकेल.
या योजना नक्कीच प्रत्येक भारतीयांसाठी जगण्याचा आधार बनतील व सोबतच त्यांच्या भविष्याला दिशा देण्यास ही सहाय्यक ठरतील ज्या महापुरुषांच्या नावाने या व अन्य योजना आहेत त्या नक्कीच त्यांच्या कर्तुत्वाला साजेशा ठरतील यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील आहोत.
शासकीय योजना
महाराष्ट्रातील सर्व शासकीय योजनांची इत्यंभूत माहिती मिळण्याचे ऐकमेव ठिकाण
Note: संबंधित विभागातील योजना पाहण्यासाठी "योजना बटन" वर क्लिक करा.
समाजकल्याण विभाग
मागासवर्गीयांचे सामजिक व शैक्षणिक जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांच्या उन्नतीसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेषसहाय विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागा मार्फत वेगवेगळया योजना व उपक्रम.
दुग्ध विकास विभाग
दुधाचे उत्पादन करणे, त्यावर योग्य ते संस्करण करून त्याची विक्री करणे तसेच त्यापासून विविध पदार्थ बनविणे व त्यांची विक्री करणे इ. बाबींचा दुग्धव्यवसायामध्ये समावेश होतो. दुधाचे उत्पादन करणे यात दुधाळ जनावरांचे प्रजनन, खाद्य, दूध काढणे व देखभाल करणे हे ओघानेच येते.
कृषी विभाग
शेतकऱ्यांना उपलब्ध संसाधनाचा परिपूर्ण वापर करून अधिकाधिक आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी कृषी विभाग कार्य करीत आहे. कृषी फलोत्पादन व जलसंधारण यासह व्यापारक्षम शेती, निर्यात वृद्धी व कृषी प्रक्रिया उद्योग यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी तसेच शाश्वत शेती - अभिमुख योजना विभागामार्फत राबविण्यात येत आहेत.
मत्स्यव्यवसाय विभाग
सचिव, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय (पदुम) हे सांभाळतात. क्षेत्रीय स्तरावर मा.आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग प्रमुख यांच्या मार्फत विविध योजनांचे कार्यान्वयन.
महिला व बालविकास विभाग
अनाथ, निराधार, निराश्रीत व काळजी संरक्षणाची गरज असलेल्या महिला आणि बालकांचे व्यक्तीमत्व, सामाजिक आणि आर्थिक सबलीकरणाकरिता विविध धोरणे आणि योजना, उपक्रमांची अंमलबजावणी करून समाजाचा उपयुक्त व नबदार घटक बणविण्या करिता महिला व बाल विकास विभाग कार्यरत आहे.
जिल्हा उद्योग केंद्र
सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत सुधारीत बीज भांडवल योजना, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना तसेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) राबविल्या जातात.